1) साबुदाणा खिचडी
साहित्य -
1 वाटी भिजवलेला साबुदाणा, 2-3 चमचे चवीनुसार दाण्याचा बारीक कूट, 1 बटाटा, 2-4 हिरव्या मिरच्या, 7 ते 10 कडीपत्याची पाने, 1 चमचा जिरे, मीठ चवीनुसार (पाव चमचा हळद - optional), तेल 2-3 चमचे, चिमूटभर हिंग, कोथांबीर.
कृती : * साबुदाणा एकदा पाण्याने धुवून घेऊन 20-30 मिनिटे पाण्यात भिजू द्यावा. मग त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकावं आणि नंतर ह्या भिजलेल्या साबुदाण्याला तो फुलण्यासाठी 4 ते 6 तास किंवा रात्रभर तसेच बाजूला ठेवून द्यावे. * आता खिचडी बनविण्यास साबुदाणा अगदी हवा तसा मऊ, मोकळा सुटसुटीत तयार झालेला असेल. तेव्हा आता सर्वप्रथम दाण्याचा कुट ह्या साबुदाण्यामध्ये व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्या. * बटाट्याचे बारीक काप(slices) करून घ्या. * गॅस मध्यम आचेवर चालू करून एका कढई मध्ये तेल गरम करा मग त्यात जिरे व बारीक चिरलेली हिरवी मिर्ची तडतडून ह्या, आता बटाट्याचे काप घालून झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजू द्या. * झाकण काढून ह्यात हिंग व कडीपत्ता (हवी असल्यास हळद) घालून थोडंसं परतून आता साबुदाणा घालून 2-3 मिनिटं छान एकत्र करून त्यात शेवटी मीठ घालून गॅस बंद करावा. * ह्या मस्त खमंग तयार अश्या गरमा-गरम खिचडीवर बारीक चिरलेली कोथंबीर (चालत असल्यास तूपाची धार सोडून) लिंबाची फोड आणि केळं किंवा सफरचंद, दह्यासोबत सर्व्ह करा खूपच छान लागते.